नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे....

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे....
db patil

कल्याण -  नवी मुंबई Navi Mumbai आंतरराष्ट्रीय विमानतळाला International Airport स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील DB Patil आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता पुन्हा होऊ लागली आहे. यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने पुढाकार घेतला आहे. Navi Mumbai International Airport should be named as DB Patil International Airport ....

नवी मुंबईत निर्माण होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको CIDCO संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने केली आहे आणि याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना पत्र Letter सुद्धा लिहण्यात आले आहे.

याबाबत १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, बाळासाहेब यांच्या नावाला आमचा विरोध नाही,बाळासाहेबांचे नाव इतर प्रकल्पाला देता येईल आणि दिले सुद्धा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे.  Navi Mumbai International Airport should be named as DB Patil International Airport ....

तर याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, एखाद्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये राजकारणचा ऊहापोह करण्यापेक्षा शासनस्तरावर  योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामातराचा विषय  पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

१४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र...

रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र. प्रकल्पग्रस्त इत्यार्दीच्या न्याय-हक्कासाठी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार आणि स्थानिक नेतृत्व " स्वर्गीय दि. बा. पाटील " साहेब यांनी लढा उभारून तो यशस्वी केला, नवी मुंबईचे ऐश्वर्य दिसत आहे त्यात स्वर्गीय दि.बा. पाटील साहेबांचा मोलाचा वाटा आहे. अश्या या महान व्यक्तिमत्वाचे नाव आज त्याच ठिकाणी होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला " स्वर्गीय दि बा.पाटील नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळ " नाव देण्यात यावे असे तेथील स्थानिक भूमिपुत्र ,सर्व रायगड-ठाणे जिल्ह्यातील जनता आणि चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या मार्फत आपणास विनंती करीत आहोत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com