Gadchiroli : पोलिसांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे : जयंत पाटील

जयंत पाटील हे शनिवारी माजी आमदार पप्पू कलानी यांना भेटण्यासाठी उल्हासनगरात आले होते.
Gadchiroli : पोलिसांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे : जयंत पाटील
jayant patil

उल्हासनगर : गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचं कौतुक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. दरम्यान अमरावतीतील हिंसाचाराचा निषेध मंत्री पाटील यांनी करुन गृहमंत्री वळसे पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे नमूद केले. gadchiroli amravati jayant patil naxals latest news

jayant patil
'या' १२ दिवसांत लस घ्या अन् जिंका टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन

जयंत पाटील हे शनिवारी माजी आमदार पप्पू कलानी यांना भेटण्यासाठी उल्हासनगरात आले होते. यावेळी त्यांना अमरावतीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी विचारलं असता, कुठल्याही हिंसाचाराचा निषेधच झाला पाहिजे, पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत, असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.

गडचिरोलीत पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल विचारलं असता ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असून महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे, असं जयंत पाटील यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com