राष्ट्रवादीचे रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई

राष्ट्रवादीचे रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई
Saam Banner Template

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  एका अल्पवयीन मुलासह चौघांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव बारामती तालुका पोलिसांनी पाठवला होता. त्यास पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते आणि पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून अवघ्या 15 दिवसांच्या आत संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. (NCP's Raviraj Taware shooting accused arrested)

हे देखील पाहा

31 मे रोजी माळेगाव येथे रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे, रिबेल उर्फ राहुल यादव आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत त्यांना अवघ्या सात तासात अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला कोल्हापूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com