भयानक ! मुंबईत इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर आठ वर्षे अत्याचार

भयानक ! मुंबईत इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर आठ वर्षे अत्याचार
Neighbour allegedly rapes 16 yr old Mumbai girl from past 8yrs

मुंबई : मुंबईच्या Mumbai अंधेरी Andheri येथे एक भयानक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला अ‍ॅफ्रोडिसियाक्स इंजेक्शन देऊन तिच्यावर  आठ वर्षांपासून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तर तिचे वडील एक व्यवसायिक आहेत. Neighbour allegedly rapes 16 yr old Mumbai girl from past 8yrs

पीडित मुलीने असा आरोप केला आहे की घरा शेजारील एका जोडप्याने तिला गोळ्या आणि इंजेक्शनच्या रूपात औषध खाण्यास भाग पाडले होते. तिच्या शेजा्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला असून, गेल्या आठ वर्षांपासून असे घडत असल्याचे तिने सांगितले आहे. या जोडप्याने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. 

अंबोली Amboli पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली कि, त्यांना मुलीने तिच्या पालकांना लिहिलेली २७ पानांची चिट्टी सापडली आहे. चिठ्ठीत तिने लिहिली होते कि,  गोळ्यांमुळे ती व्यसनाधीन झाली आहे. शेजाऱ्याने तिच्यावर करण्यात आलेल्या अतिप्रसंगाच्या कृत्याची व्हिडिओ क्लिप काढली असल्याचे सांगितले आणि तिला त्यावरून ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिने मदतीसाठी उत्तर प्रदेशच्या तिच्या चुलतभावाशी संपर्क साधला. 

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, मुलीने असा आरोप केला आहे की,  तिला उत्तर प्रदेशात नेले गेले होते. तेथे चुलतभावाचे तिच्याशी एका महिन्यापासून संबंध जोडले गेले. तिने सांगितले कि, "माझ्या काकाने मला सांगितले होते की माझा चुलत भाऊ माझ्याशी लग्न करेल." तसेच या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक पोलिसांकडून करण्यात आली आहे. मुलीच्या नातेवाईकांचा दखल या प्रकरणात समावेश आहे. त्यापैकी पीडित मुलीचा काका आणि त्याचा १९ वर्षांचा मुलगा सुद्धा यात सहभागी आहे.

हे देखील पहा -

मुलीच्या वडिलांनी केल्याच्या आरोपाच्या आधारे, पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि वरिष्ठ पथक सोमेश्वर कामठे यांच्यासह त्याच्या पथकाने, निरीक्षक अब्दुल रऊफ शेख यांनी त्या मुलीला अमेठीतून Amethi सोडवले. तिचा चुलत भाऊ व मामा यांना शनिवारी अटक करण्यात आली. तिच्या घराशेजारील जोडपे, चुलत भाऊ व काका हे पोलिस कोठडीत आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com