नवे हवाई दलप्रमुख एअर मार्शल भदोरिया

 नवे हवाई दलप्रमुख एअर मार्शल भदोरिया

नवी दिल्ली - हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून सरकारने आज एअर मार्शल राकेश कुमार सिंह (आरकेएस) भदोरिया यांची नियुक्ती जाहीर केली. सध्या ते हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ येत्या ३० सप्टेंबरला निवृत्त होत आहेत.

एअर मार्शल भदोरिया हे पुण्याजवळच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) छात्र असून, १५ जून १९८० रोजी ते लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले. ३६ वर्षांच्या सेवेत विविध प्रकारच्या २६ विमानांच्या उड्डाणांचा ४,२५० तासांचा अनुभव त्यांना आहे. 

परमविशिष्ट सेवा पदक (पीव्हीएसएम), अतिविशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) आणि वायूसेना पदके त्यांना मिळाली आहेत. हवाई दलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून मार्च २०१७ ते ऑगस्ट २०१८ या काळात त्यांनी जबाबदारी सांभाळली. हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते ऑगस्ट २०१८ पासून प्रशिक्षण विभागाचे प्रमुख होते.

Web Title: New Air Force Chief rakesh kumar singh bhadoria
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com