गरजू रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी अलिबागेत अनोखा उपक्रम...
raigad news

गरजू रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी अलिबागेत अनोखा उपक्रम...

रायगड : दुसऱ्या लाटेत कोरोनाचा Corona प्रादुर्भाव राज्यात अचानक वाढल्याने रुग्णांना आरोग्य सेवा द्याची कशी,असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांना तातडीने बेड Bed मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने आलिबागेत Alibag विविध सुविधायुक्त आयसोलेशन सेन्टर उभारण्यात आले आहे. New initiative to provide oxygen beds to needy patients in Alibag   

जिल्हा रुग्णालयातील बेड गरजू व गंभीर रुग्णांना उपलब्ध व्हावेत. यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेतला आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची Oxygen गरज नाही किंवा जे बरे होऊन देखरेखीखाली आहेत. अशा रुग्णांसाठी अलिबागेत ५० बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. तेथे रुग्णांना जेवणापासून खेळ, टीव्ही TV, वायफाय WiFi अशी मनोरंजनाची साधने देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहेत. शिवाय आरसीएफ कॉलनीतील सरकारी आयसोलेशन सेंटरसाठी ५० बेड आणि २५ ऑक्सिजन सिलेंडर देखील, शेकापने उपलब्ध करून दिले आहेत. महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील Chitralekha Patil यांनी याकामासाठी पुढाकार घेतला आहे.  त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची टीम यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.

Edited By- Digambar Jadhav

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com