सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन ट्विस्ट

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन ट्विस्ट
Saam Banner Template

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या Shushant shingh Rajput मृत्यूला Death पुढील महिन्यात बरोबर एक वर्ष पूर्ण  होणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड Bollywood आणि मनोरंजन विश्व हादरून गेलं होतं. या घटनेचा तपास सध्या एनसीबीकडे देण्यात  आहे. New twist in Sushant Singh Rajput suicide case

या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी या प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एनसीबीने NCB सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

हे देखील पहा -

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता एनसीबीने त्याचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला Siddharth Pithani अटक केली आहे. सिद्धार्थ पिठानीला  त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आले आहे. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर गेल्यावर्षी सिद्धार्थ पिठानीचे नाव वारंवार समोर आले होते आता पुन्हा एकदा हे नाव चर्चेत आले आहे. New twist in Sushant Singh Rajput suicide case

दरम्यान, या प्रकरणी सीबीआय सुद्धा तपास करत होती. सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीलाही  प्रकरणी अटक करण्यात आली होती. रियावर  सुशांतला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मदतीने ड्रग्स  पुरवल्याचा आरोप होता. या प्रकरणाला अनेक वळणं मिळत होती.

या प्रकरणातून पुढे अनेक सेलिब्रिटींना तपासाला सामोरे जावे लागले होते. तर काही जणांवर अटकेची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येमागचे नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com