WTC Finals साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी
Saam Banner Template

WTC Finals साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी

INDvsNZ: न्यूझीलंडने विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम (WTC Final) सामन्यासाठी न्यूझीलंडने संघ जाहीर केला आहे. किवी संघांच्या (New Zealand Squad) मॅनेजमेंटने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात न्यूझीलंड 18 जून पासून साऊथहॅम्पटन येथे भारताविरुद्ध ऐतिहासिक अंतिम सामना खेळणार आहे. नुकत्याच झालेल्या सिरीजमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला आहे. न्यूझीलंडने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी किवी संघ आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल.

न्यूझीलंडने टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट आणि एजाज पटेल या खेळाडूंना कसोटीच्या अंतिम सामन्यात निवडलेल्या संघात समाविष्ट केले आहे. न्यूझीलंड संघात अंतिम सामन्यासाठी एजाज पटेल हा एकमेव फिरकीपटू आहे. (New Zealand squad for WTC Finals announced; Opportunity for a player of Indian descent)

हे देखील पाहा

न्यूझीलंडने अष्टपैलू म्हणून कॉलिन डी ग्रँडहोम आणि विशेष फलंदाज विल यंग याचा संघात समावेश केला आहे. तर टॉम ब्लंडेलची यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. याखेरीज इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळलेल्या डग ब्रॅसवेल, जेकब डफी, डॅरेल मिशेल, रचिन रविंद्र आणि मिशेल सैंटनर या पाच खेळाडूंचा संघातून बाहेर ठेवण्यात आलेले आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी खेळू शकला नव्हता. परंतु, त्याची दुखापत गंभीर नाही आणि तो भारताविरुद्धच्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात कर्णधारपदावर पुनरागमन करणार आहे.

न्यूझीलंडचा संघ
केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लूंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहॉमे, मॅट हेनरी, काईल जेमीसन, टॉम लॅथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बी.जे. वॉटलिंग, विल यंग. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com