नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलीने कोरोनाशी केली फाईट
baby

नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलीने कोरोनाशी केली फाईट

भुवनेश्वर : कोरोनाची Korona दुसरी लाट Second Wave खूपच भयानक आहे त्यामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त संक्रमित होताना दिसून आले आहेत. कोरोना काळात अश्या अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे या जीवघेण्या रोगाला घाबरून न जात आपल्या त्याच्याशी लढण्याची उमेद मिळते. Newborn baby girl fights with Corona

हे देखील पहा -

मग एक वयाची शंभरी ओलांडून गेलेले आजोबा असतील आणि हे नुकतेच जन्मलेले बाळ. काही कोरोनातुन सावरलेल्या व्यक्तींनी कोरोनाची भीती थोडी फार पळवून लावली आहे.

ओडिशामध्ये Odisha कोरोनाने एक महिन्याचे एक बाळ संक्रमित झाले होते. त्यामुळे त्या चिमुकलीला कालाहांडी मधून भुवनेश्वर Bhuvneshwar ला उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यात एक खासगी दवाखान्यात उपचारासाठी या नवजात चिमुकलीला ICU व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १० दिवस या चिमुकलीला व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले होते.

डॉ.अरिजीत महापात्रा म्हणाले की, या मुलीवर स्टेरयेड, रेमडेसिवीर Remedisivir आणि विविध प्रकारचे उपचार करण्यात आले होते . २ आठवडे तिच्यावर उपचार सुरु होते. आणि आता लहान मुलगी पूर्णपणे बरी झालेली आहे. लवकरच तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल. हे काही कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही असेही तिचे डॉक्टर म्हणाले .

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com