हिंगोलीत मुख्य कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक उभा आहे रामभरोसे ! 

हिंगोलीत मुख्य कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक उभा आहे रामभरोसे ! 
No attention of the hospital to the oxygen tank in Hingoli

हिंगोली:  हिंगोलीच्या Hingoli जिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रचिती येणारे चित्र समोर आले आहे. कोरोना Corona बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टँकची Oxygen Tank सुरक्षा रूग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. No attention of the hospital to the oxygen tank in Hingoli 

हिंगोली जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील भागात हा टँक उभारण्यात आला आहे. आणि याच ठिकाणावरून रुग्णालयात जाणारा मुख्य रस्ता देखील आहे. दररोज शेकडो रुग्ण आणि नातेवाइकांची या रस्त्यावरून ये-जा सुरू असते. मात्र असे असताना रुग्णालय प्रशासनाने या ऑक्सिजन टँक जवळ कोणताही सुरक्षा रक्षक नेमलेला नाही. 

विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच नाशिकमध्ये Nashik ऑक्सिजन टॅंकमधून गळती Leakage झालेली घटना आपण पहिली होती. ऑक्सिजन अभावी उपचार घेणाऱ्या रुग्णांना आपला जीव तडफडून गमवावा लागला होता. त्यानंतर देखील आरोग्य प्रशासन कुंभकर्ण झोपेत असल्याचं चित्र हिंगोली जिल्हा रुग्णालयाच्या या प्रकरणावरून दिसत आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com