व्याजदरात कोणतेही बदल नाहीत : शशिकांत दास 
Shashikant Das.jpg

व्याजदरात कोणतेही बदल नाहीत : शशिकांत दास 

वृत्तसंस्था :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाचा Financial year (2020-22) सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. जीडीपीच्या 9.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे.  आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे.  आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ( एप्रिल ते जून )  अर्थव्यवस्थेत 18.5  टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. तर दुसर्‍या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर)  7.9 टक्के, तिसर्‍या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) 7.2 टक्के आणि चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) 6.6 टक्के वाढ होण्याची  शक्यता असल्याचे शशिकांत दास यांनी म्हटले आहे.  (No change in interest rates: Shashikant Das) 

त्याचबरोबर, आरबीआयने यापूर्वी वित्तीय वर्ष 2022 साठी जीडीपीच्या 10.5 टक्के वाढीचा अंदाज लावला होता. पहिल्या तिमाहीसाठी आरबीआयने 26.2 टक्के, दुसऱ्या तिमाहीसाठी 8.3 टक्के,  तिसऱ्या तिमाहीसाठी 5.4 टक्के आणि चौथ्या तिमाहीसाठी 6.2 टक्के वाढ  होण्याचा अंदाज वर्तवला होता.  तर केंद्रीय बँकेने  2021-22 या आर्थिक वर्षात  ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) चलनवाढीचा दर 5.1 टक्के राहील,  असे अपेक्षित असल्याचे दास यांनी म्हटले.  

तथापि, देशातील कोविडच्या दुसऱ्या लाटेतील निर्बंधामुळे आर्थिक हालचालींवर होणारा परिणाम कायम राहणार आहे. मात्र, चांगल्या पावसामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ शकते.रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर (कर्ज दर) 3.35 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.  रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. वाढत्या महागाईमुळे पॉलिसी दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक पतधोरण समितीने घेतला आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये वास्तविक जीडीपी 7.3 टक्के नोंदविण्यात आला तर  एप्रिलमध्ये महागाईचा दर 3.3 टक्के होता.
 

Edited By- Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com