कोकण आणि माझे अतूट नाते ते कोणीही तोडू शकत नाही  - उद्धव ठाकरे ( पहा व्हिडिओ )

uddhav thackeary
uddhav thackeary

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आज सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळातील Cyclone नुकसानग्रस्त Damage भागाची पाहणी केली. मालवण Malvan व वेंगुर्ला येथील नुकसानग्रस्त नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. कोकण Konkan आणि माझे नाते अतूट आहे ते कोणीही तोडू शकत नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. No one can break Konkan and my inseparable relationship Uddhav Thackeray

चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. किनारी भागातील मच्छिमार बांधव आणि हापूस व काजू बागायतीचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचे देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

काही भागांमध्ये आजही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तर किनारी भागामध्ये अनेक गोड्या पाण्याच्या विहिरी मध्ये समुद्राचे खारे पाणी गेल्याने या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत या ठिकाणच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांच्या समोर स्थानिक मच्छीमार नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सरकारने आपल्याला भरघोस मदत करावी अशी मागणी केली आहे. No one can break Konkan and my inseparable relationship Uddhav Thackeray

जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत . जिल्ह्यात 5,901 घरांची अंशतः पडझड झाली आहे. तर 20 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत . यामुळे 10 कोटींचे नुकसान झाले आहे . मच्छिमारांचे 2 कोटी , जिल्हा परिषद शाळा तसेच आरोग्यकेंद्र इमारतींचे 10 कोटी , शेतकऱ्यांचे 10 कोटी, वीज महावितरणचे 40 कोटी असे मिळून जिल्ह्यात एकूण 72 कोटींचे नुकसान झाले आहे . 

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com