आता बस झालं मंजुरी मंजुरी, आता कामं चालू करा- आमदार राजू पाटील.

आता बस झालं मंजुरी मंजुरी, आता कामं चालू करा- आमदार राजू पाटील.
raju patil.

काल कल्याणचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे (Dr.Shrikant Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत एमआयडीसी निवासी विभागातील रस्त्याच्या कामांसाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतले याची माहिती दिली. आता यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. मनसे आमदार यांनी सांगितले की आत्तापर्यत तीनदा बॅनर लागले, 110 कोटी घोषणा तेव्हा पण केली. आत्तााही तेच सांगत आहेत. कोणते रस्ते महापालिका काम करणार व कोणते एमआयडीसी हे ठरले आहे. मात्र अजून टेंडर प्रक्रीया झालेली नाही.(Now it's time for approval, now start work - MLA Raju Patil.)

आम्ही तेथील रस्त्याच्या दुरवस्था बद्दल आवाज उठवू म्हणून केलेला हा टाईमपास आहे. ही कामे टेंडर होऊन दिवाळीत निघतील तोपर्यंत काय? आता बस झालं मंजुरी मंजुरी करण, आता कामे चालू करा. आम्ही त्याचे स्वागत करु.  आता किमान खड्डे भरायला सुरुवात करा. स्वतःच बोलतात की २५ वर्षे येथे काहीच झालेले नाही, त्यामुळे आम्ही वेगळे बोलण्याची गरज नाही असे आमदार पाटील यांनी सांगितले.

हे देखील पाहा

एमआयडीसी औद्योगिक भागासह निवासी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून निवासी भागातील या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी निधीच्या घोषणा झाल्या अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नव्हतं. अखेर या रस्त्याच्या कामासाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत आज खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. तसेच या भागातील रस्ते दुरुस्ती एमआयडीसी करणार की केडीएमसी याबाबत निर्णय होत नव्हता.

मात्र आता हा पेच सुटला असून 50 टक्के खर्च एमआयडीसी आणि 50 टक्के केडीएमसी करणार आहे. प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होण्यास काही कालावधी लागणार असून या दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवासी भागातील या रस्त्यांची डागडुजी केडीएमसी कडून करण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले होते.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com