अबब! आता पाकिस्तानमध्ये  पेट्रोलपेक्षा दूध महाग

अबब! आता पाकिस्तानमध्ये  पेट्रोलपेक्षा दूध महाग


इस्लामाबाद : पाकिस्तानने आडमुठेपणामुळे आपल्याच पायावर दगड मारून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये दुधाचे दर पेट्रोल, डिझेलपेक्षा महाग झाल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानने भारताबरोबरच सर्व व्यवहार तोडले आहेत. याचा परिणाम तेथील जिवनाश्यक वस्तूंवर झाला आहे. पाकिस्तानमध्ये मंगळवारी मोहरम सण साजरा करण्यात आला. या सणाला नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागले. कराची शहरासह सिंध प्रांतात दूध सुमारे 140 रुपये लीटर दराने विकण्यात आले. पाकमध्ये दूधापेक्षा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. पेट्रोल 113 रुपये आणि डिझेल 91 रुपये लिटर दराने मिळत असताना दूध मात्र आणखी महाग मिळत आहे.

एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, दुधाच्या कमतरतेमुळे दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कराची शहरासह अनेक शहरांत 120 ते 140 रुपये प्रती लिटर दराने दूध विक्री होत आहे. मोहरमनिमित्त दुधाला जास्त मागणी आहे. 

Web Title: Now! Now milk is more expensive than petrol in Pakistan


 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com