Mucor mycosis; म्युकर मायकोसिस रुग्णांचा नागपुरात वाढतोय आकडा

Mucor mycosis; म्युकर मायकोसिस रुग्णांचा नागपुरात वाढतोय आकडा
meucormysios

नागपूर: राज्यात १८ मे पर्यंत ९५० म्युकरमायकोसिस Mucor Mycosis आजाराच्या  रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, पुणे Pune जिल्ह्यानंतर आता नागपूर Nagpur विभागात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत. रुग्णसंख्या पुणे विभागात २७३ तर, नागपुरात २३३ सक्रिय रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. The number of Mucor Mycosis patients is increasing in Nagpur

कोरोनाची Corona साथ आटोक्यात येत असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट आता ओढवू लागले आहे.  राज्यात १८ मेपर्यंत या आजाराच्या ९५० रुग्णांची नोंद झाली आहे आणि विशेष म्हणजे, पुणे नंतर नागपूर विभागात या आजाराचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची Health System चिंता  आता वाढली आहे.

हे देखील पहा -

आरोग्य विभागाने म्युकरमायकोसिसच्या वाढत्या धोक्याविषयी गंभीर इशारा दिला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने औषधांचाही तुटवडा पडला आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक प्रचंड तणावाखाली आहेत. आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, पुण्यात २६७ तर पुणे विभागातील तीन जिल्हे मिळून सर्वाधिक २७३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात २३३ रुग्ण हे आढळून आले आहेत. The number of Mucor Mycosis patients is increasing in Nagpur

नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून २३३, लातुर Latur विभागातील चार जिल्हे मिळून १२८ रुग्ण, औरंगाबाद Aurangabad विभागातील चार जिल्हे मिळून ८५ रुग्ण. अकोला Akola विभागातील पाच जिल्हे मिळून ३९ रुग्ण. नाशिक Nashik विभागातील पाच जिल्हे मिळून ३९रुग्ण. ठाणे Thane विभागातील तीन जिल्हे मिळून २२ रुग्ण. तर कोल्हापूर Kolhapur विभागातील चार जिल्हे मिळून सर्वात कमी म्हणजे १८ रुग्ण आढळून आले आहेत. तज्ज्ञाच्या मते, खासगी रुग्णालयांकडून Private Hospitals या रुग्णांची योग्य पद्धतीने नोंदणी होत नसल्याने याच्या कित्येक पटीने अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com