रुग्ण संख्या कमी झाल्यानं, बीडच्या महिला डॉक्टरांचा डान्स झाला व्हायरल
female doctors dancing

रुग्ण संख्या कमी झाल्यानं, बीडच्या महिला डॉक्टरांचा डान्स झाला व्हायरल

तर डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

बीड - बीडच्या अंबाजोगाई येथील, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील रुग्णांची patients संख्या कमी झाल्याने, रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी female doctors पीपीई PPE किटसह डान्स Dance करून आपला आनंद व्यक्त केला आहे. तर या डान्सचा व्हिडिओ सामाजिक मध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. यात महिला डॉक्टर गाण्याचा तालावर थिरकताना दिसत आहेत. (As the number of patients at Swarati Hospital in Ambajogai decreased, female doctors danced)

हे देखिल पहा - 

अंबाजोगाई तालुक्यात मागील काही दिवसांपासून, कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. यामुळं स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात, उपचारासाठी डॉक्टर आणि तेथील सर्व स्टाफची चांगली तारांबळ उडाली होती.

अनेक डॉक्टर आणि नर्स यांना आठरा तास ड्युटी करावी लागली. मात्र आता अंबाजोगाई येथील रुग्णसंख्या आटोक्यात आली असून आता 50 हुन कमी झाली आहे. त्यामुळं या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतल्याच दिसत आहे. 

त्यामुळेच मागील महिना भरापासून रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या या महिला डॉक्टरांनी, थेट पीपीई किट घालून असताना गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद व्यक्त केला आहे . याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे !

Edited By - Puja Bonkile

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com