राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेनी दिला नागरिकांना दिलासा...

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेनी दिला नागरिकांना दिलासा...
gondia mns

गोंदिया  - महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे MNS सर्वेसर्वा राज ठाकरे Raj Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त Birthday मनसे तालुका सालेकसा यांच्या वतीने व मनसे महिला सेनेचे सालेकसा यांच्या संकल्पनेने, वाढत्या पेट्रोलच्या किंमतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र शासन Maharashtra Government आणि केंद्र शासनाचे Central Government  निषेध नोंदवत तालुक्यातील जनतेला 10 रुपये प्रति लिटर पेट्रोल स्वस्त देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. On the occasion of Raj Thackeray's birthday, MNS gave relief to the citizens 

केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या कर आकारणीमुळे पेट्रोलचे भाव शंभरी पार झाले आहे. याचा निषेध करत व राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्त पेट्रोल उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुका अध्यक्ष उषा कुरंजेकर व मनसे तालुका  अध्यक्ष  ब्रजभूषण बैस यांनी दिली आहे. 

हे देखील पहा -

या उपक्रमातून तालुक्यातील नागरिकांना आजच्या पेट्रोल चा दर  104.15 रुपये असून या दराच्या दहा रुपयांनी स्वस्त  94.15 रुपये  प्रमाणे पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले. सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजता पर्यंत सालेकसा येथील क्षिरसागर पेट्रोल पंप येथे 10 रुपयाने स्वस्त पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले. On the occasion of Raj Thackeray's birthday, MNS gave relief to the citizens 

यासाठी सालेकसा बस स्थानक येथे मनसेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मंडपातून कुपनचे वितरण करण्यात  आले. याचा फायदा तालुक्यातील नागरिकांनी  घेतला. महत्त्वाचे म्हणजे कुपन ची कालावधी 14 जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com