राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक... 

राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक... 
Oil tanker hits container on national highway

वसई : मुंबई Mumbai- अहमदाबाद Ahmedabad राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार Pelhar फाट्याजवळ ऑईल Oil टँकर व कंटेनरचा अपघात होऊन दोन्ही गाड्यांना भीषण आग Fire लागल्याची घटना धक्कादायक घटना पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या भीषण अपघातामध्ये जळीत घटनेतील ऑईल टँकरचा चालक मात्र ,गंभीर जखमी झाला  आहे. Oil tanker hits container on national highway

त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे वसई पूर्वेस पेल्हार फाट्यावरील गुजरात लेनच्या मार्गाने एक मालवाहू कंटेनर जात होते. मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका ऑईल टँकरने ओव्हर टेकच्या नादात या कंटेनरला जोरदार धडक दिली आहे. बघता बघता या दोन्ही गाड्यांनी पेट घेतले.

हे देखील पहा 

या ठिकाणी तात्काळ दोन्ही गाड्यांची आग आटोक्यात आणण्यासाठी वसई विरार महानगरपालिका Municipal Corporation अग्निशमन दलाच्या विरार पूर्व पश्चिम व नालासोपारा Nalasopara येथील पाण्याचे बंब बोलवण्यात आले होते. जवानांनी दोन तासांचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही, मात्र ऑईल टँकर चालक हा गंभीर जखमी झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com