शेती अवजाराने वार करून ५२ वर्षीच्या इसमाचा खून

शेती अवजाराने वार करून ५२ वर्षीच्या इसमाचा खून
nagpur murder

नागपूर - जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस स्टेशन Police Station अंतर्गत पिपळा डाग बंगला या ठिकाण संतोषनाथ सोलंकी (52) या व्यक्तीची हत्या Murder करण्यात आली आहे.संतोष नाथ आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. old man killed with agricultural tool

शेतीच्या कामासाठी वापरली जाणारी कुदळ agricultural tool वापरून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही हत्या का करण्यात आली, कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही. मृतकाचे खापरखेडा या ठिकाणी मिल्क शेक व जूसचे दुकान आहे.

मृतकाची बायको मुलांसह 4 महिन्या पासून वेगळी धापेवाडा येथे राहत होती. घटनेच्या वेळेला मृतक घरी एकटेच होते. घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठवून तपासाला सुरुवात केली आहे. old man killed with agricultural tool

हे देखील पहा -

संतोषनाथ सोलंकी हे कुटुंबापासून वेगळे राहत होते. त्यांचे कुणासोबत भांडण होते का या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या शिवाय पोलीस मृतकाच्या परिचित आणि नातेवाईकांची विचारपूस करण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com