आॅलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला खून प्रकरणात अटक

आॅलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला खून प्रकरणात अटक
Wrestler Sushil Kumar

नवी दिल्ली : आॅलिंपिक Olyamipcs पदक विजेता कुस्तीपटू Wrestler सुशील कुमार Sushil Kumar याला दिल्लीत झालेल्या सागर राणा हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हा खून झाल्यापासून सुशील कुमार फरारी होता. Olympics Medalist Wrestler Sushil Kumar Arrested for Murder

दिल्लीच्या New Delhi छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर झालेल्या मारामारीत २३ वर्षीय ग्रीको रोमन कुस्तीगीर सागर याची हत्या झाली होती. त्यानंतर सुशील कुमार फरारी झाला होता. पोलिसांनी Police त्याच्यावर एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. सुशील कुमारनं १५ मेच्या सुमारास अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्या विरोधात आऊटलूक नोटिस जारी केली होती. 

सुशील कुमारच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांनी Delhi Policeउत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा व पंजाब या राज्यांत छापे टाकले होते. मात्र, सुशीलकुमारचा शोध लागत नव्हता. सुरुवातीला सुशील कुमार उत्तराखंड येथे गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. आज सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुशीलकुमारच्या अटकेचे वृत्त नाकारले होते. मात्र, नंतर त्याला पुष्टी देण्यात आली. 

हे देखिल पहा

पोलिसांनी छत्रसाल स्टेडियम येथील सीसीटिव्ही फुटेज मिळाले होते. त्यात सुशील कुमार आपल्या २०-२५ साथीदारांसह सागर राणाला अत्यंत अमानुषपणे मारहाण करतानाची दृश्ये कैद झाली आहेत. हे सर्वजण सागरला लाथा बुक्क्यांनी तसेच बॅट व हाॅकीने मारहाण करीत असल्याचे या सीसीटिव्ही फुटजमधून दिसते आहे. Olympics Medalist Wrestler Sushil Kumar Arrested for Murder

सुशील कुमार हा फ्रीस्टाईल कुस्तीगिर आहे. तो ६६ किले वजन गटात खेळत असे. २०१० मध्ये त्यानं या गटात जागतिक विजेतेपद मिळवलं होतं. २००८ च्या बिजिंग आॅलिंपिक्समध्ये त्याला कांस्य पदक मिळालं होतं. २०१२ मध्ये रौप्य पदक मिळालं होतं. त्याला रेल्वेमध्ये खास नोकरी देण्यात आली होती. त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार तसेच पद्मश्री किताबानं गौरवण्यात आलं होतं.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com