दिलासादायक ! मुंबईत तब्बल एका महिन्यात दीड लाख रुग्ण कोरोनामुक्त....

covid19
covid19

मुंबई - दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या Paitents आता आटोक्यात येत आहे. नव्याने लागू करण्यात आलेली नियमावली Rules व कठोर निर्बंधामुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यात पालिकेला यश आले आहे. मागील एका महिन्यात १ लाख ५४ हजार ९५३ रुग्ण कोरोनामुक्त Corona Free झाले आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या तब्बल ७ हजार ३०१ ने कमी झाली आहे. त्यामुळे प्रतिबंधांच्या नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या १५ लाख १५ हजार रहिवाशांची सुटका झाली आहे. One and a half lakh patients released corona in a month in Mumbai

मुंबईसह Mumbai राज्यभरात २२ एप्रिलपासून लागू करण्यात आलेली नियमावली तसेच  १ मेपासून लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधाचा रुग्ण संख्या  घटण्यासाठी चांगला फायदा झाला आहे. एका महिन्यात तब्बल १ लाख ५४ हजार ९५३ जणांनी कोरोनावर  मात केली आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या तब्बल ७ हजार ३०१ ने कमी झाल्यामुळे येथील नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या १५ लाख १५ हजार रहिवाशांची सुटका झाली आहे.

हे देखील पहा -

कोरोना रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांची संख्या २५ हजारांवरून ५० हजारांपर्यंत नेली. प्रभावी उपाययोजनांमुळे रोज रुग्ण आढळण्याचे प्रमाण एक हजारापर्यंत खाली आले आहे. यामध्ये दररोज ३० ते ४० हजार चाचण्या करण्यात आल्या. २२ एप्रिलपासून २२ मेपर्यंत पालिकेने तब्बल ९ लाख ९६ हजार ८४८ चाचण्या केल्या आहेत. या कालावधीत मुंबईत १०२४७३ कोरोनाबाधित  रुग्ण आढळून आले आहेत. तर १५४९५३ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. One and a half lakh patients released corona in a month in Mumbai

सद्यस्थिती मुंबईत सध्या ४४ कंटेनमेंट झोन, २०६ सील इमारती आणि ४७१७ इमारतीचे भाग-मजले सील आहेत. या ठिकाणी २ लाख ९३ हजार घरांतील ११ लाख ७७ हजार रहिवासी (कंटेन्मेंट झोन) प्रतिबंधात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com