"या" शहरात मिळणार 1 रुपयात एक लिटर पेट्रोल

"या" शहरात मिळणार 1 रुपयात एक लिटर पेट्रोल
One liter of petrol will be available in this city

डोंबिवली - पेट्रोलने petrol शंभरी पार केली आहे. पेट्रोल दर वाढविरोधात भाजप BJP सोडली, तर सर्वच पक्षानी आंदोलन केली आहे. मात्र शिवसेनेने अनोखी शक्कल लढवली आहे. One liter of petrol will be available in this city

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 13 जून 21 रोजी सकाळी 10 ते 12 दरम्यान डोंबिवली एमआयडीसी येथील पेट्रोल पपंवर 1 रुपयात एक लिटर पेट्रोल दिले जाणार आहे. 

हे देखील पहा - 

याउपक्रमाचे आयोजन शिवसेना नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे यांनी केले आहे. तसेच अंबरनाथमध्ये 50 रुपयात पेट्रोल दिले जाणार आहे. एक प्रकारे येणाऱ्या पालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम ठेवला जात आहे, असे काही नागरिकांचे मत आहे. 

आता पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होणार का? असे झाल्यास नियोजन कसे केले जाणार हे प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाले आहे. 

 Edited By - Puja Bonkile  
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com