कर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन

Saam Banner Template
Saam Banner Template

शेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष समाजसेवक कर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपन्न झाले.  या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीमान मनोज पाठक विदर्भ साहित्य संघ केंद्रीय कार्यकारणी सदस्य होते. विदर्भ साहित्य संघ शाखा शेगाव च्या वतीने सलग तीन वर्ष कर्मवीर सुमेध राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण विदर्भ साहित्य संघ शाखेच्या अध्यक्षा माया दामोदर करीत असतात परंतु कोरोणाच्या दुष्टचक्रामुळे दोन वर्षापासून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रद्दबादल करण्यात आलेला आहे यावर्षी विदर्भ साहित्य संघ शाखा शेगाव च्या वतीने सुमेध वानखडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे कवी संमेलन घेण्यात आले. (Online Poet Meeting on the occasion of Karmaveer Sumedh Wankhade's Memorial Day)

आभासी कवी संमेलन शिस्तबद्ध पद्धतीने हसत खेळत आनंदाने पार पडले या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक दा गो. काळे ,विवेक सराफ,कीर्ती संघाणी, नंदकिशोर माळी. टी आर नायसे  स्नेहा गचके यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. कवी संमेलनाची सुरुवात लातूरच्या कवयित्री एडवोकेट  कुमारी विशाखा बोरकर यांनी केली. 

हे देखील पाहा

 *बाप ह्रदय लेकराचं ही कविता त्यांनी सादर केली. 

"बाप ह्रदय लेकराचं
बाप अवघे आकाश, बाप जगण्याचा श्वास, बाप घरटं आयुष्याचं..."
औरंगाबाद हुन देवानंद पवार यांनी आपली कविता सादर केली -"समाजाची ही गाय, नाही बांधली दोरीने ..
भीम झाला माझी माय,
माय चाटे वासराले .....
कुरुक्षेत्र हरियाणा वरून प्राध्यापक डॉक्टर अशोक  यांनी सादर केलेली कविता किसान हूँ
" किसान हूँ
आसमान मे बोल रहा हु 
कुछ लोग कहा रहे है की पगले अगर जमीन पर भगवान जम सकता है तो आसमान मे भी धान  जम सकता है 
और तो दोनो मे से कोई आयेगा 
 या तो जमीन से भगवान उखडेगा या आसमान मे धान जमेगा ......
सिने-नाट्य अभिनेत्री निर्माती उद्योजिका आणि चित्रकार भाग्यश्री देसाई पुणे यांची कविता आर्जव
"वाट तुझी पाहुनी जन्म गेला उभा
 मी झाले राधा पण कमरेवर हात ठेवून तू स्तब्ध उभा.... 
यानंतर नांदूर्याचे रमेश सरकटे निवृत्त पोलीस कमिशनर यांनी गझल सादर   केली.   

आठवणी चा झोका तुटला
 स्वप्नांचा ही मेळा उठला वडील मरता हिस्से  वाटी 
 भाऊ-भाऊ भरती खटला 
 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वासुदेवराव खोपडे
 हे कवी आहेत अकोला येथे राहतात यांची मायबाप ही कविता -
 सोडुनीया माय बापा
 नका करू रे पाप
 देवाहुनी थोर
 माय बाप

कवी प्रवीण पहुरकर खामगाव आपल्या कवितेतून म्हणतात-
"साऱ्या जगाला आई कळली
 साऱ्या जगाला बाप मात्र समजलाच नाही
लावले माणसाने अनेक शोध
 बापाचे हृदय कळलेच नाही
 ही बाप नावाची कविता त्यांनी सादर केली पुढे बी एल खान आपल्या कवितेत म्हणतात -
"एकतेच्या पानात जर नसला चुना
तसा मुसलमाना विना देश होईल सुना

अशी एकतेवरची कविता झाल्यानंतर वाशीमच्या मधुराणी बनसोड यांनी बाबासाहेब
 ही कविता सादर केली -
बाबासाहेब !
 सत्याग्रहाची खरी व्याख्या तुमच्यामुळे कळली
तुम्ही आम्हाला माणूस बनण्याचा मंत्र दिला
 आणि मृत या जीवाला जाणीव करून दिली जिवंत असण्याची....
 ज्येष्ठ कवयित्री प्रतिमा इंगोले
ही कविता त्यांनी सादर केली कलावंताचे पडलेले पाय भेगाळलेल्या हातपाय तडा
 गेलेले हृदय
 तरीही त्याचे स्वरूप पण न आवडणारे
तरीही त्याचे स्वयंभूपण  आवडणारे

ज्येष्ठ सुभाष सोनवणे अहमदनगर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनी पेरणी ही कविता सादर केली माणसातील माणुसकी ला कायमची जाग यावी समता बंधुता शांतता मुक्तहस्ते फिरत राहावी  अशाप्रकारे विविधांगी कविता या आभासी कवी संमेलनात कवी व कवयित्रींनी सादर केल्यात. स्नेहा गचके, रमेश धुरंधर मुक्ताईनगर , सुरेश साबऴे, बुलढाणा यांनी आपल्या कविता सादर केल्या शेवटी सुप्रसिद्ध कवयित्री, प्रकाशिका ,समाजसेविका, माया दामोदर यांनी आपल्या सुमेध या कवितेद्वारे या कवी संमेलनाचा समारोप केला. अभिनंदनीय होतं सुमेध वानखडेचं काम त्यांच्या महान कार्याला मी करते प्रणाम कवी संमेलनाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाच्या शेगाव शाखेचे अध्यक्ष माया दामोदर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री दामोदर परकाळे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावचे सचिव यांनी केले या प्रकार ऑनलाइन कवि संमेलन संप्पन झाले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com