पुण्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, आज केवळ ३८४ रुग्णांची नोंद

पुण्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, आज केवळ ३८४ रुग्णांची नोंद
covid19.jpg

पुणे - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे.  only 384 patients were registered today in pune

मात्र असे असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडणाऱ्या पुण्यात आज नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घाट झाली आहे. पुणे शहरात आटोक्यात येत असलेल्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. मात्र आता या रुग्ण वाढीतून पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

आज पुण्यात एकुण रुग्ण ३८४ रुग्णांची नोंद झाली आहे तर ८५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आता रोजच्या करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा को कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. only 384 patients were registered today in pune

हे देखील पहा -

पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ७० हजार ३११ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ८ हजार २८४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ७५१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर ४ लाख ५६ हजार५०९रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात सध्या ५ हजार ५१८ रुग्णांवर उपचार उपचार सुरु आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com