धारावीनं करून दाखवलं;  २४ तासांत फक्त १ कोरोना रुग्ण

 धारावीनं करून दाखवलं;  २४ तासांत फक्त १ कोरोना रुग्ण
dharavi

महाराष्ट्र सरकारने अनलॉकची (Maharashtra Unlock) तयारी सुरु केली आहे. राज्यात टप्प्या टप्प्यामध्ये अनलॉक होईल असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.  असे असतानाही राज्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोना विषाणूचा मागच्या २४ तासात फक्त एकच पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.(Only one patient of Corona in Dharavi in last 24 hours)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, 'एप्रिलच्या सुरूवातीला धारावी हे कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट बनले होते. 8 एप्रिल रोजी एकाच दिवसात येथे 99 रुग्ण आढळले होते. पण आज झोपडपट्टी क्षेत्रात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 1 वर आली आहे. धारावी येथे आतापर्यंत एकूण 6,829 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यातील 6451 लोक उपचारानंतर बरे झाले, तर 19 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

हे देखील पाहा

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सुमारे अडीच लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेली धारावी ही साडेसहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. पण महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा या क्षेत्रातील कोरोनाचा वेग ‘4-टी’ मॉडेलच्या (ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट) माध्यमातून रोखला आहे. एप्रिल-मे मध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या कपाळावर चिंतेची रेषा ओढली गेली होती, परंतु गेल्या 19 दिवसांपासून येथील कोविड रूग्णांची संख्या एक अंकी आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com