धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात RTPCR चाचणी निगेटिव्ह असणारांनाच प्रवेश

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात RTPCR चाचणी निगेटिव्ह असणारांनाच प्रवेश
banavat report

धुळे : Dhule जिल्ह्यामध्ये कोरोनाचा Corona प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍या मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आणि यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये Collectorate जिल्ह्यातील District सर्व ठिकाणाहून नागरिकांची विविध कामांसाठी वर्दळ सुरू असते आणि त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. Only RTPCR test negative can enter the Collectorate

जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकास आपली आरटीपीसीआर RTPCR चाचणी निगेटिव्ह आलेला अठ्ठेचाळीस तासांच्या आतील तपासणी अहवाल सोबत असणे बंधनकारक करण्यात आल आहे.

हे देखील पहा -

48 तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह तपासणी अहवाल सोबत  नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. या आशयाचे सूचनाफलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आले आहेत.

त्यामुळे आता कुठलेही निवेदन किंवा कुठल्याही प्रकारचे काम घेऊन जाताना नागरिकांनी आपला आरटीपीसीआर निगेटिव्ह असलेला अठ्ठेचाळीस तासांच्या आतील अहवाल सोबत घेऊन मगच कार्यालयात यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. Only RTPCR test negative can enter the Collectorate

Edited By - Krushna Sathe 

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com