OBC आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन- विजय वडेट्टीवार

OBC आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन- विजय वडेट्टीवार
Organizing a two day camp on the issue of OBC reservation

पुणे :  राज्यातील ओबीसी OBC समाजाची जनगणना सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही करणार आहोत, असे सांगून येत्या २६ व २७ जून दिवशी लोणावळा Lonavla या ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नसंदर्भात दोन दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पक्षातील नेत्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी केले आहे. Organizing a two day camp on the issue of OBC reservation 

विओ ओबीसी VJNT जनमोर्चा बैठकीला ते पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण Maratha reservation, राज्यपाल नियुक्त आमदार MLA, चंद्रपूर Chandrapur जिल्हातील दारूबंदीसह विविध विषयावर त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वेाच्य न्यालयालयाने निर्णय घेतला आहे. त्यावर राज्य सरकार State Government जबाबदार कसे, असा उलट प्रश्‍न त्यांनी यावेळी भाजपला केला आहे. 

आरक्षणाची ५० टक्क्यांनी मर्यादा आणि त्यासाठी घटनादुरूस्ती केल्याशिवाय हा प्रश्‍न सुटणार नाही, असे सांगून ते म्हणाले,‘‘ २०११ मध्ये जी जनगणना झाली आहे. त्याचा डेटा केंद्र सरकार उपलब्धच करून देत नाही. मोदी व शहा जोडीने तो अडवून ठेवला आहे. यामुळे ओबीसी आरक्षणावरून राजकारण न करता सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. Organizing a two day camp on the issue of OBC reservation 

सर्वोच्य न्यायलयाने ते रद्द केल्यामुळे ते देशभर लागू झाले आहे.’’ राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांच्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले,‘ कशामुळे या नियुक्त्या रखडल्या आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.’’ तर पेट्रोल दरवाढीबददल आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी कुठे दडून बसल्या आहेत. ७० रूपये लिटर पेट्रोल झाले, तर त्या रस्त्यावर उतरले होते. आता शंभर रूपये लिटर झाले, तर त्या दिसेनाशा झाले आहेत, असा टोलाही यावेळी लगाविला आहे.

हे देखील पहा 

चंद्रपूर येथील दारूंबदी उठविण्याच्या निर्णयावरून सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी वडेट्टीवार यांच्यावर टिका केली होती. त्यावर विचारले असता, ते म्हणाले,‘ बंग हे देशातील मोठे समाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामुळे चंद्रपूर आणि संपूर्ण राज्य व्यसनमुक्त झाले आहे,’’ अशी टिका यावेळी त्यांनी आपल्या बोलण्यातून केली आहे. 

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com