रायगड जिल्ह्यात म्युकरमायक्रोसीस आजाराचा शिरकाव
mucormycosis

रायगड जिल्ह्यात म्युकरमायक्रोसीस आजाराचा शिरकाव

रायगड -  कोरोना Corona बरोबरच आता म्युकर मायक्रोसीसने Mucormicrosis राज्यात डोकं वर काढल आहे. कोरोना मधुन बरे झालेल्या रुग्णांन मध्ये आता म्युकरमायक्रोसीस हा आजार आढळून येत आहे. सध्या म्युकर मायक्रोसिज या नविन आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे .Outbreak of Mucormicrosis in Raigad District

 हे देखील पहा -

आता म्युकर मायक्रोसीस या आजाराने रायगड जिल्ह्यात देखील शिरकाव केला आहे. रायगड Raigad जिल्ह्यात या आजाराचे आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये दोन रुग्ण हे उपचार घेत आहेत तर एकाचा या आजाराने उपचारा दरम्यान शुक्रवारी मृत्यु झाला आहे . या मध्ये दोन रुग्ण हे पनवेल Panvel मधील आहेत तर एक रुग्ण खोपोली मधील आहे  अशी माहिती देण्यात आली आहे.

या तिन रुग्णांन मध्ये दोन पुरुष आणी एक महीलेचा समावेश आहे अशी माहीती जिल्हाधीकारी यांनी दिली आहे . तर म्युकर मायक्रोसीस  आजाराच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com