अ‍ॅाक्सिजन बँक आपल्या दारी, एका कॉलवर मिळणार 'अ‍ॅाक्सिजन'

अ‍ॅाक्सिजन बँक आपल्या दारी, एका कॉलवर मिळणार 'अ‍ॅाक्सिजन'
patil nilangekar

केंद्रीय मंञी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लातुर जिल्ह्यातील निलंगा येथे माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते अक्का फाँडेशनच्या वतीने 10 अ‍ॅाक्सिजन काँन्सेट्रेटर लोकार्पण करण्यात आले.  त्यामुळे आता अ‍ॅाक्सिजन (Oxygen) मशीन एका फोनवर रुग्णांना मिळणार आहे.(Oxygen Bank at your doorstep, you will get 'Oxygen' on one call)

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून संभाव्य तिस-या लाटेची तयारी केली जात आहे.  त्याचाच एक भाग म्हणून अतिदक्षता विभागाचे लोकर्पण करण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण दगावले असून अ‍ॅाक्सिजन मिळत नसल्यामुळे प्रशासनाला अ‍ॅाक्सिजन  मिळवण्यासाठी प्लाँटवर 24 तास तळ ठोकून बसावे लागले संभाव्य तिसरी लाट ही लहान बालकामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच तयारी केली जात आहे.  

हे देखील पाहा

शिवाय अ‍ॅाक्सिजन अभावी रूग्णांचा मृत्यू होऊ नये म्हणून आक्सिजन प्रकल्प निर्मितीवर सर्वजन भार देत आहेत.  केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यासाठी आठ तर लातूर येथे दोन अशा एकून दहा अ‍ॅाक्सिजन काँन्सेट्रेटर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. 

Edited By : Pravin Dhamale 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com