जालन्यात आॅक्सिजन सिलेंडरची साठवणूक पकडली

जालन्यात आॅक्सिजन सिलेंडरची साठवणूक पकडली
Oxygen Cylinders confiscated in Jalana

जालना : शहरातील Jalana गरीबशहा भागातील एका गोडाऊनवर महसूल,पोलीस Police आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ४९ सिलेंडर जप्त केले आहेत. या सिलेंडरमध्ये ऑक्सिजनचे किती आणि  अन्य वायूचे सिलेंडर किती याचा शोध आता प्रशासनाकडून घेतला जात आहे. Oxygen Cylinders Confiscated in Jalana

काल मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.गरीबशहा भागातील गोडाऊनमध्ये अवैधरीत्या सिलेंडर साठवून ठेवले असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना मिळाली होती. या माहितीवरून तहसीलदारांनी पोलिसांच्या मदतीने या गोडाऊनवर धाड टाकली असता  लहान-मोठ्या सिलेंडरच्या टाक्या आढळून आल्या.

यामुळे या सर्व सिलेंडरच्या टाक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर किती आहे याचा आता शोध घेतला जात आहे. शिवाय गोडाऊन मालकाकडे सिलेंडर साठवण्याचा परवाना आहे का याचाही शोध घेतल्या जात असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com