भंडाऱ्यात ऑक्सिजन ग्रुप करतोय ऑक्सिजनची मदत !

भंडाऱ्यात ऑक्सिजन ग्रुप करतोय ऑक्सिजनची मदत !
oxygen group

भंडारा : Bhandara कोरोना Corona संकटाच्या गंभीर काळात ऑक्सीजन Oxygen मिळवण्यासाठी एकीकडे रुग्णांना वणवण करावी लागत असताना भंडारा शहरात 'ऑक्सिजन ग्रुप' च्या माध्यमातून कोरोना रुग्णांना निःशुल्क ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑक्सिजन मदत ग्रुप नावाने सुरु करण्यात आलेल्या या गटाच्या माध्यमातून सहा मित्र एकत्रित येऊन कोरोना संकटात सामाजिकतेचे भान जपत आहेत. यामुळे कोरोना काळात रुग्णांना मोठा आधार निर्माण झाला आहे. 'Oxygen Group' in the Bhandara is providing Oxygen to Corona Patients!

शहरातील ॐ साईं स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्स च्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे भंडारा शहरातील कोरोना रुग्णांसाठी एक दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी वणवण फिरन्याची गरज आता संपुष्टात आली आहे. भंडारा शहरातील गरजू कोरोना रुग्ण ज्यांची ऑक्सीजन पातळी 85 ते 94 पर्यंत आहे. त्या रुग्णांना ऑक्सिजन ची गरज असल्याने त्यांना हे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हे देखील पहा -

भंडारा शहरातील ॐ साईं स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोर्स च्या मालक रोशन काटेखाये यांच्या संकल्पनेतून हा ग्रुप तयार झाला आहे. या ग्रुप मधील इतर संजय चौधरी, मनीष वंजारी, यश ठाकरे,शालिक अहिरकर,चंद्रेश काटेखाये यांनी एका व्यक्ति कडून उपयोगात नसलेले 10 ऑक्सीजन कॉन्सट्रेंटर मिळविले त्या नंतर ऑक्सीजन मदत ग्रुप असा व्हाट्सएप ग्रुप तयार करून गरजू रुग्णांपर्यंत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 'Oxygen Group' in the Bhandara is providing Oxygen to Corona Patients!

यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असने व ऑक्सिजन पातळी 85 ते 94 च्या आत असने गरजेचे आहे. अश्या रुग्णांना घरी जाऊन हे तरुण ऑक्सिजन कॉन्सट्रेटर लावून देत आहेत. विशेष म्हणजे ह्या साठी ते कोणतेही शुल्क घेत नाहीत शिवाय ॐ साईं स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्स मध्ये येऊन ही तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. 

ऑक्सिजन मदत ग्रुप च्या मदतीने अनेक गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळाले असून अनेकांचे प्राण वाचले आहेत. यामुळे नातेवाईकांची आपल्या रुग्णासांठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी होणारी धावपळ वाचली असून रुग्णांच्या नातेवाईकांनी ह्या ग्रुप चे आभार ही मानले आहेत. 

भंडारा जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यात दिवसेंदिवस ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. अश्या प्रसंगी सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर न टाकता आपले सामाजिक दायित्व समजून अनेक लोक मदतीचे हात पुढे करीत आहे त्यात ऑक्सिजन ग्रुप मदत चे कार्य  वाखाणण्याजोगे आहे. 'Oxygen Group' in the Bhandara is providing Oxygen to Corona Patients!

Edited By- Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com