ऑक्सिजनची बचत करणारे जुगाड पंढरपुरात यशस्वी; डाॅ गिराम यांचा यशस्वी प्रयोग

ऑक्सिजनची बचत करणारे जुगाड पंढरपुरात यशस्वी; डाॅ गिराम यांचा यशस्वी प्रयोग
pandharpur news

पंढरपुर - देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यातच आता  कुत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. ऑक्सिजन  अभावी रूग्णांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची बचत करणारे जुगाड पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ अरविंद  गिराम यांनी यशस्वी केले आहे. Oxygen-saving Jugaad succeeds in Pandharpur

पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालय सह इतरही रुग्णालयात रिझर्वयर बॅगचा मास्क सोबत वापर करून रुग्णांना क्षमते एवढ्या कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केल्याने  50 टक्के ऑक्सिजनची बचत होते.

एकीकडे देशभरात ऑक्सिजनची कमतरता असताना दुसरीकडे बचतीचा पंढरपूर पॅटर्न सध्या पुढे येत आहे. कोरोना  संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतांशी रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा लागत आहे. अशातच रुग्णांना क्षमता एवढे ऑक्सिजन पुरवून 50 टक्के ऑक्सिजन  बचतीचे सूत्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरविंद गिराम यांनी शोधले आहे. त्यांच्या प्रयोगाची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही दखल घेतली आहे. त्याच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक ही होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com