इम्रान खान यांच्याकडे वीजबिल भऱण्यासाठी पैसे नाहीत

 इम्रान खान यांच्याकडे वीजबिल भऱण्यासाठी पैसे नाहीत

पंतप्रधान सचिवालय कार्यालयाला इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीला (IESCO) ४१ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचे बिल भरणे बाकी आहे. तसेच गेल्या महिन्याचे ३५ लाख रूपयांचे बिलही अद्याप भरण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इलेक्ट्रीक कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा विचारणा केल्यानंतरही बिल भरण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यापूर्वीच्या महिन्याचेही तब्बल ५ लाख ५८ हजारांचे बिलही अद्याप भरण्यात आलेले नाही. त्यामुळे थेट इलेक्ट्रिसिटी कंपनीनने पंतप्रधान कार्यालयालाच वीज जोडणी कापण्याचा इशारा दिला आहे.


दरम्यान, पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आता पाकिस्तानमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्येही भरती करण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने गाडी विकत न घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

एकीकडे पाकिस्तानमध्ये आर्थिक टंचाई निर्माण झाली असली तरी त्यांच्या कुरापती मात्र कमी होताना दिसत नाहीत. अशातच आता आणखी एक नवी बाब समोर आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाचे ४१ लाखांचे वीज बिल अद्यापही भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच बिलाची रक्कम न भरल्याने त्यांच्या कार्यालयाची वीज जोडणी कापण्यात येणार असल्याचे म्हटले आहे...

Web Title: Pakistan Pm Imran Khan Electricity Bill Not Paid Company Will Soon Cut Electricity Supply

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com