पाकिस्तान भारतासोबत चर्चेला तयार; इम्रान खान यांनी ठेवली 'अट'
indvspak.

पाकिस्तान भारतासोबत चर्चेला तयार; इम्रान खान यांनी ठेवली 'अट'

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एका अटीवर भारताशी (India) चर्चा करण्यास तयार झाले आहेत. पाकिस्तानमधील उर्दू वृत्तपत्रानुसार इम्रान खान यांची मुलाखत आणि त्यांचा विरोधी पक्षाशी असलेला वाद सध्या चर्चेत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताशी चर्चा करण्याची ऑफर दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की, काश्मीरमधील परिस्थिती पूर्वस्थितीत आणण्यासाठी जर भारत फक्त रोडमॅप देत असेल तर पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यास तयार आहे. अखेर इम्रान खान याची काय मागणी आहे? भारताचा आक्षेप काय आहे? जाणून घेऊयात. (Pakistan ready for talks with India; Imran Khan sets 'condition')

इम्रान खान यानी ठेवली जुनीच अट 
इम्रानने पुन्हा एकदा जुनीच अट भारता समोर ठेवली आहे. ते म्हणाले की काश्मीरमधील पूर्वस्थिती परत आणण्यासाठी जर भारत फक्त रोडमॅप देत असेल तर पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे. पुढे ते म्हणाले काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून भारताने लाल रेषा ओलांडली आहे. ते म्हणाले की ऑगस्ट 2019 चा निर्णय संपवण्यासाठी कोणती पावले उचलली जातील हे भारताने सांगणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करणे पाकिस्तानला मान्य असेल असे इम्रान खान म्हणाले. इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. तथापि, सुरुवातीपासूनच पाकिस्तान हा युक्तिवाद नाकारतो. भारताचे म्हणणे आहे की हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. कोणत्याही देशाला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

हे देखील पाहा

370 रद्द करण्याचा भारताने रोडमॅप द्यावा  
इम्रान म्हणाले की, 5 ऑगस्ट 2019 रोजी घटनेच्या कलम 370 अंतर्गत काश्मीरला मिळणारा विशेष राज्याचा दर्जा भारताने रद्द केला आहे. या घटनात्मक दुरुस्तीमुळे भारताने काश्मीरचे रूपांतर दोन केंद्र शासित प्रदेशात केले आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की जोपर्यंत काश्मीरला विशेष दर्जा मिळत नाही तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही. यावेळी आपल्या मुलाखतीत इम्रान म्हणाले की, भारताने केवळ हा निर्णय रद्द करण्याचा रोडमॅप जरी दिला तरी पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे.

आपल्या मुलाखतीत इम्रान म्हणाले की, आम्ही नेहमीच भारताशी आपले मन मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. इम्रान म्हणाले की सर्वांना माहित आहे की जर आपल्याला भारतीय उपखंडातील गरीबी कमी करायची असेल तर एकमेकांशी व्यापार वाढवणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. या संदर्भात त्यांनी युरोपियन युनियनचे उदाहरण दिले.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com