पालखी सोहळा : वारकरी व गावकरी यांच्यात वाद

 पालखी सोहळा : वारकरी व गावकरी यांच्यात वाद
Palkhi Ceremony Dispute between Warkari and villagers

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे सावट आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका टाळून यावर्षीही, माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी बसने आळंदी ते पंढरपूर व्हावा, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांच्या आरोग्याचे दृष्टीने करण्यात आली आहे. तर वारकरी पालखी सोहळा पायी व्हावा यावर ठाम आहेत . गावकरी व वारकरी यांच्यात वाद निर्माण झाला आहे.  Palkhi Ceremony: Dispute between Warkari and villagers

कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. यावर्षीही मागील वर्षीप्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी-पंढरपूर पालखी सोहळा नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

हे देखील पहा - 

मागील वर्षभरात कोरोनाचे मोठे संकट लोकांसमोर उभे झाले आहे. यात अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अजून पुर्णपणे कोरोना संकट संपलेले नाही. कोरोना गर्दीत जास्त वाढत असल्याने गर्दी नियंत्रित राहावी यासाठी तसेच पालखी सोहळ्यामुळे कोरोना संकट वाढु नये. यासाठीच दक्षता म्हणून यावर्षीही शासनाने आळंदी-पंढरपूर पालखी सोहळा बसने मोजक्याच भाविकांत साजरा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मागील वर्षी कुंभमेळा, पंढरपूर पोट निवडणूक, तसेच इतर ग्रामपंचायत निवडणुका, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रम यामुळे देखील कोरोना महामारी वाढली आहे. हा अनुभव लक्षांत घेता यावर्षी पालखी सोहळा कोरोना महामारी संकट कायम असल्याने शासनाने व्यापक लोक हितासाठी सामाजिक आरोग्याची काळजी घेवून कोरोना महामारी वाढू नये यासाठी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बसने पालखी सोहळा साजरा करावा.

वारकऱ्यांचा पायी वारीचा हट्ट सुरू आहे. तो त्यांनी सोडावा तसेच संतांची शिकवण सामाजिक आरोग्य, सलोखा, विश्वशांतीचा विचार करून कोरोना महामारीचे संकट असल्याने याचा विचार करून मागणी करण्यात आली आहे. 

सोहळा बसने ये-जा करतांना प्रथा-परंपरांचे पालन व्हावे, प्रस्थान नंतर व परत वारीहून आल्यानंतर आपआपल्या मंदिरांत धार्मिक कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे करून आषाढी वारी सोहळा मोजक्याच लोकांत साजरा करावा. शासनाचे कोरोना संदर्भातील नियम, सूचना, आदेशांचे पालन करत पालखी सोहळा साजरा व्हावा यासाठी शासनाकडे  मागणी करण्यात आल्याचे आळंदी ग्रामस्थां यांनी सांगितले आहे. 

Edited By - Puja Bonkile 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com