अजित पवारांची टगेगिरी संपली; गोपीचंद पडळकरांचा टोला

अजित पवारांची टगेगिरी संपली; गोपीचंद पडळकरांचा टोला
Pandharpur Defeat of ruling Mahavikas Aghadi in Mangalwedha Assembly

पंढरपूर : पंढरपूर- मंगळवेढा Pandharpur- Mangakwedha विधानसभा मध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना जो गर्व होता, तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर काहीही करू शकतो. तो गर्व येथील मतदारांनी मोडून काढला आहे. तसेच अजित पवारांची Ajit Pawar टगेगिरी संपली आहे. असा टोलाही आमदार पडळकर Padalkar यांनी लगावला आहे. Pandharpur Defeat of ruling Mahavikas Aghadi in Mangalwedha Assembly

ते सांगली Sangali मध्ये बोलत होते. मुंबईत Mumbai बसून देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी तिन्ही पक्षांचे योग्य नियोजन लावले आहे. फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये करेक्ट कार्यक्रम केला आहे. यापुढे फडणवीस साहेब पुढचा करेक्ट कार्यक्रम करतील. देवेंद्र फडणवीस साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे. फडणवीस पाहिजेत, हे या मतदार संघाने दाखवून दिले आहे, असेही पडळकर म्हणाले आहेत.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भारत भालके Bharat Bhalke यांचे चिरंजीव भगीरथ भालके Bhagirath Bhalke यांचा भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे Samadhan Awatade यांनी पराभव केला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या विजयानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे फोन वरून आभार मानले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com