कोरोना रुग्णांसाठी देवदुत ठरतोय पंढरपुरचा औषध विक्रेता

कोरोना रुग्णांसाठी देवदुत ठरतोय पंढरपुरचा औषध विक्रेता
pandharpur news

पंढरपूर - कोरोना Corona संसर्गामुळे पंढरपूर Pandharpur व परिसरात हाहाकार उडाला आहे. अशा संकट काळात जाती धर्माच्या भिंती पार करुन  गोरगरीब आणि  मदतीसाठी Help व्याकुळ झालेल्या  कोरोना  रुग्णांसाठी येथील मुस्लीम समाजातील मुज्जमिल कमलीवाले हा तरुण देवदूत ठरत आहे. कमलीवाले Kamlivale या तरुणाने  मागील महिन्याभराच्या काळात कोरोना रुग्णांना वेळेवर मदत केल्यामुळे सुमारे शंभरहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची येथील प्रांताधिकारी सचिन ढोले Sachin Dhole व राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालकेंनी Bhagirath Bhalke दखल घेवून कौतुक केले आहे. Pandharpur medical store owner is helping Corona patients

मुज्जमील कमलीवाले यांचे पंढरपूर शहरातील कालिकादेवी चौक परिसरात औषध Medicine विक्रीचे दुकान आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचे संकट आल्यापासून त्यांनी कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गेल्या महिन्यभरापासून पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे.

हे देखील पहा - 

शहरातील सर्व खासगी व सरकारी दवाखाने रुग्णांनी फुल्ल भरले आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड व वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे जीवाला मुकावे लागले आहे. अशा संकट काळात कोरोना रुग्णांना मदत मिळावी यासाठी त्यांनी ओन्ली बेड आणि हाॅस्पिटल,  व्हॉट्सॲप ग्रुप तयार करुन त्या द्वारे  त्यांनी रुग्णांना  मदत सुरु केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी महिन्या भराच्या काळात सुमारे 100 हून अधिक रुग्णांना विविध भागात ऑक्सीजन बेड आणि औषधोपचार मिळवून देण्याचं पुण्याचं काम केले आहे. त्यांच्या या मदतीमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

कमलीवले हे स्वतः सांगली, मिरज, सोलापूर, कोल्हापूर,पुणे आदी ठिकाणच्या हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांशी संपर्कात राहून येथील रुग्णांना बेड आणि  ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतात. दोन दिवसापूर्वी एका रुग्णाला आॅक्सीजन बेडची गरज होती. ती गरज कमलीवाले यांच्या व्हॉट्सॲप Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण झाली. त्यामुळे त्या रुग्णांचे प्राण वाचले. ही माहिती येथील प्रांताधिकारी सचिन ढोले व राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालकेंंना मिळाल्यानंतर त्यांनी कमलीवाले या तरुणांचे आभार व्यक्त करुन सामाजिक कार्याचे कौतुक केले. Pandharpur medical store owner is helping Corona patients

मागील दीड वर्षापासून कमलीवाले हे शहरातील लोकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्याचे काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी गरीब व गरजू लोकांना मास्क,आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप करुन मदत केली आहे. पालावर आणि झोपडपट्टीत राहणार्या कुटुंबाना  विविध सणावाराच्या निमित्ताे जेवण आणि कपडे भेट देवून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची माहिती मिळाल्यानंतर  अलीकडेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील कमलीवाले यांचे कौतुक केले होते.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com