फायझर, मॉडर्ना सारख्या परदेशी लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा;  पण तो कसा?
pfizer and moderna.jpg

फायझर, मॉडर्ना सारख्या परदेशी लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा; पण तो कसा?

नवी दिल्ली : कोविड 19  Covid 19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण Vaccination  मोहिम जोर धरू लागली आहे. भारतात सध्या दोन स्वदेशी लसीचे लसीकरण सुरू आहे. अशातच आता  परदेशी लसीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.  कोविडच्या दुसऱ्या लाटेतील भयावहता पाहून केंद्र सरकारने भारतीय औषध नियंत्रण संस्थेने Indian Institute of Drug Control  परदेशी लसी भारतात आणण्याच्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहे.  

फायझर Pfizer आणि  मॉडर्ना Moderna सारख्या परदेशी लसी  भारतात आणल्यानंतर  वेगळ्या चाचणीची आवश्यकता नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने  केलेल्या या बदलामुळे  आता फायझर आणि  मॉडर्ना  लसी भारतात येण्याचा मार्ग अधिक सोयीस्कर झाला आहे. 

href="https://www.saamtv.com/three-members-family-died-corona-same-day-3-hours-apart-13741" target="_blank">दुर्देवी ! 3 तासाच्या फरकाने एकाच दिवशी घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसऱ्या लाटेची झळ संपूर्ण देशाला लागली आहे.  आता देशातील दुसरी लाट ओसरायला लागळ इयसाली तरी अद्याप  मृत्यूसंख्या वाढत आहे.  या पार्श्वभूमीवर फायझर आणि मॉडर्नासारख्या ज्या लसीना  जागतिक आरोग्य संघटनांनी आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. अशा लसींची भारतात चाचणी करून त्याची विश्वासर्हता तपासण्याची गरज नाही असा निर्णय भारतीय औषध नियंत्रण संस्थेने घेतला आहे.  त्यामुळे आता या लसीही भारतीय लोकांना उपलब्ध होऊ शकतात.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपले मत व्यक्त केले आहे.  दुसऱ्या देशातील नगरिकांनीही फायझर आणि मॉडर्ना लसीचे लसीकरण केले आहे. त्यामुळे आम्हीही या लसीचे लसीकरण घेण्यासाठी  तयार आहोत  संबंधित  कंपन्यांनी भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितल्यास त्यांना मंजुरी दिली जाईल, असे  आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

दरम्यान, भारतात परदेशी कंपन्यांची कोविड प्रतिबंधक लस वापरण्यापूर्वी ब्रिज ट्रायलची अट घालण्यात आली होती जी आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेने ज्या परदेशी लसीना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे, अशा लसीची गुणवत्ता आणि परिणाम याची चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

कोविड 19 लसीकरणाच्या राष्ट्रीय तज्ञ गटाच्या शिफारसीनंतर   ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या लसीना परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती डीजीसीआयचे प्रमुख वीजी सोमानी यांनी दिली आहे. त्यामुळे आता आधीपासून वापरात असलेल्या आणि ज्या लसी लाखों लोकांनी घेतल्या आहेत, अशा लसीना आता देशात वेगळ्या चाचणीची गरज नाही.  तसेच जर एखाद्या लसीला तेथील नॅशनल कंट्रोल लॅबोरेटरीने प्रमाणित केले असेल तर भारतात अशा लसीला चाचणीची गरज नाही, असेही वीजी सोमानी यांनी म्हटले आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com