वास्तू पूजनाचं जेवण गावकऱ्यांच्या बेतलं जीवावर

वास्तू पूजनाचं जेवण गावकऱ्यांच्या बेतलं जीवावर
vastu pujan

कौथुरना गावातील गजानन खोकले यांच्या घरी काल वास्तु पूजनाचा कार्यक्रम होता. 12 गावातील तब्बल 200 लोक या कार्यक्रमात अनधिकृत हजर होते. जेवणानंतर लोक घरी गेल्यांवर दुसऱ्या दिवशी लोकांना सकाळी अचानक हगवन,मळमळ, जाणवू लागली. लागलीच लोकांची गर्दी कौथुरना प्राथमिक केंद्रात होऊ लागली. त्यानंतर तपासात वास्तु पूजनाच्या जेवनातुन हा प्रकार झाल्याचे उघड़ झाले असून तब्बल 104 लोकांना जेवनातुन विषबाधा झाली.(People have been disturbed by the Vastu Puja meal)

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भंडाऱ्यातुन वौद्यकीय पथक गावात दाखल झाले असता या प्रकरर्णी तब्बल 103 लोकांना प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात  आली असून 1 महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृति स्थिर आहे. 

हे देखील पाहा

ह्या वास्तु पूजनाचा आयोजक घरमालक गजानन खोकले ह्यांना सुद्धा विषबाधा झाली असून त्यांनाही प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. या कार्यक्रमात तब्बल12 गावातील लोक आले असून मांढल, महलगांव, उमरी,विहिरगाव, मांडवी, खैरी,रोहा,मंडनगाव,अकोला टोला ,खैरी, रोहना,पिपरी पुनर्वसन या गावातील तब्बल 29 लोक बाधित झाले आहे. 

राज्यात कोरोनाची स्थिति अजुनही बिकट आहे. लॉकडाउन 15 जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशसानाकडून थोड़ी शितिलता मिळाली आहे. मात्र अजुन ही कोणत्याही सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाही, तरही ग्रामीण भागात अनधिकृतपने छुप्या मार्गाने कार्यक्रम सुरु असल्याचे दिसुन येत आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com