अरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे
school news

अरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे

मुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पालकांसह ग्रामस्थांसोबत उद्धट बोलणाऱ्या शिक्षिकेच्या बदलीसाठी ग्रामस्थांनी ३०० सह्यांचं पत्र दिल आहे.मात्र त्यावर निर्णय झाला नसल्यानं पालकांनीच आता शाळेला टाळ ठोकले आहे. people locked zilla parishad school

कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकेतर गैरवर्तन हे ग्रामस्थांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पालक,  इतर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या शिक्षिकेची बदली करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र असे असताना देखील ठाणे जिल्हा परिषदेकडून या पत्रांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

जोपर्यंत शिक्षकाची बदली होत नाही तोपर्यंत शाळेचे दार उघडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे आता या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिवसेनेचे कल्याण पंचायत समितीचे उपसभापती किरण ठोंबरे यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तातडीने निर्णय जिल्हा परिषद शाळेला भेट दिली तसेच शिक्षिकेचे होणारे गैरवर्तन आणि केलेले पाठ करावे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाखवली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com