बंद पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर आल्याने नागरिकांनी केली गर्दी

बंद पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर आल्याने नागरिकांनी केली गर्दी
Saam Banner Template (42).jpg

सांगली   - सांगलीच्या Sangli संजय नगर Sanjay Nagar मध्ये बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून अचानक पेट्रोल बाहेर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे पेट्रोल Petrol घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी तौबा गर्दी केली होती. याची माहिती मिळताच मनपा अग्निशामक विभागाने Fire department तातडीने धाव घेऊन खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या. तसेच पेट्रोल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. as petrol came out of a closed petrol pump tank

संजय नगर येथे विरुपाक्ष पेट्रोल पंप आहे. हे पेट्रोल पंप गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. आज सकाळी या टाकीच्या व्हॉल्व्ह मधून पेट्रोल बाहेर येत असल्याने एकच खळबळ माजली. तेथील महापालिका कर्मचाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे आपल्या ताफ्यासह तिथे तातडीने दाखल झाले. 

यावेळी व्हॉल्व्ह आणि आजूबाजूची पाहणी करीत पेट्रोल वरती कसे येत असावे याबाबत तपासणी सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते. as petrol came out of a closed petrol pump tank

हे देखील पहा -

संजयनगर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पेट्रोल बाहेर येऊ लागल्याने परिसरात खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 300 लिटर पेट्रोल बाहेर काढण्यात आले आहे. अजून ही पेट्रोल बाहेर पडत आहे. तर या ठिकाणी कुठलीही दुर्घटना झाली तर पेट्रोल मालक जबाबदार असतील अशी नोटीस अग्निशमन विभागाने दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com