Petrol-diesel price hike | पेट्रोल डिझेलच्य़ा किंमती पुन्हा वाढल्या, वाचता कसे असतील नवे दर?

Petrol-diesel price hike | पेट्रोल डिझेलच्य़ा किंमती पुन्हा वाढल्या, वाचता कसे असतील नवे दर?

देशातील इंधनाच्या दरात आठवड्याभरामध्ये तिसऱ्यांदा वाढ करण्यात आलीय.  पेट्रोल आणि डिझेलमध्ये लिटरमागे २५ पैशांनी वाढ झाली असून,  मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ९२ रुपये 4 पैशांवर पोहोचलेत.  तर डिझेलच्या दराने नवीन उच्चांक गाठला.  आठवड्याभरात तब्बल 75 पैशांनी इंधन दराचा भडका उडालाय. सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या किमतींमुळे सरकारने इंधनावरील अबकारी करामध्ये कपात करण्याची मागणी होतेय.

हेही वाचा 

पाहा यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओ - 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार येत्या ३० नोव्हेंबरला ओपेक देशांच्या सदस्यांची बैठक होणार आहे. करोना लस, युरोपात पुन्हा लॉकडाउनची शक्यता आणि उत्पादन कपात यावर या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून ४० डॉलरवर स्थिर असलेला कच्च्या तेलाचा भाव आता ४५ डॉलरच्या आसपास गेला आहे. युरोपात पुन्हा लॉकडाउन केल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपातील रिफायनरी तात्पुरत्या बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com