चक्क नखांवरती साकारली शिवाजी महाराजांची प्रतिमा, शिवराज्याभिषेक सोहळा... 

चक्क नखांवरती साकारली शिवाजी महाराजांची प्रतिमा, शिवराज्याभिषेक सोहळा... 
Pictures of Shiva coronation ceremony on nails

सोलापूर : सोलापुर Solapur शहरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युवा कलाकार Artist प्रणोती औदुंबर गोरे हिने चक्क हाताच्या बोटांच्या नखांवर चित्रकलेतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारला आहे. Pictures of Shiva coronation ceremony on nails

सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj, मुजरा करणारा मावळा, हाती अबदागिरी घेतलेले शिलेदार, मानदंड घेऊन उभा असलेले प्रधान असे प्रसन्न दृश्य दर्शविण्याचा हा एक अनोखा शिवभक्तीपर प्रयत्न या छोट्या शिवभक्ताकडून दिसून येत आहे.

हे देखील पहा -  

किल्ले रायगड Raigad येथील नयनरम्य सोहळा घरबसल्या अनुभवण्याचा उद्देश मनी ठेवून हर हर महादेव अशी गर्जना करत '१.५ सेमी × 1 सेमी' इतक्या कमी नखाच्या पृष्ठभागावर भव्य जयघोष सोहळा रंगांच्या माध्यमातून चित्रकार प्रणोती यांनी सादर केलेला आहे. हा कलाप्रकार छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो असेच भासत आहे. 

Edited By- Digambar Jadhav
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com