पिंपरी - चिंचवड महापालिकेचा लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना मोठा आधार 

पिंपरी - चिंचवड महापालिकेचा लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना मोठा आधार 
Pimpri-Chinchwad Municipal Corporations big support to the disabled during the lockdown

पिंपरी - चिंचवड : शहरातील शेकडो अंध कुटुंबियांच्या उदरनिर्वाहची व्यवस्था करत, महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाने Department of Disability Welfare लॉकडाऊनच्या या कठिण काळात  अंधाच्या घरी विझणारी चूल पुन्हा पेटवली आहे. जन्मतःच डोळ्यात साठलेल्या अंधारामुळे ज्यांचे आयुष्य कायमचच लॉकडाऊन झालं, अशा अंधजणांना कोरोना महामारीच्या या कठीण काळात दोन वेळच्या अन्नसाठी परवड होऊ नये म्हणून पिंपरी - चिंचवड महापालिकेनं या अंधाना 40 किलो ग्रॅम अन्न धान्य असलेली राशन किट देऊन आधार दिला आहे. Pimpri-Chinchwad Municipal Corporations big support to the disabled during the lockdown

पिंपरी - चिंचवड Pimpari Chinchwad महापालिकेचे दिव्यांग कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहरात दोनशेच्या वर अंधजन कुटूंब आहेत. आपली संगीताची कला रस्त्याच्या कडेला सादर करून काही अंधजन आपलं चरितार्थ चालवतात. तर काही आपल्याला जमेल अस छोटं - मोठं करून आपलं जीवन व्यथित करतात.

मात्र कोरोना लॉक डाउनच्या काळात या अंधजणांनची उपजीविका पुर्णपणे बंद झाली. त्यामुळे आता जगायचं कस ? असा प्रश्न या अंधजन बांधवांना पडला होता. त्यासाठी आम्ही काही एन जी ओ ची मदत घेऊन या अंधजन बांधवांना जीवनावश्यक वस्तू असलेले राशन किट मोफत वितरित करत आहोत असं अण्णा बोदडे यांनी सांगितलं. 

हे देखील पहा - 

राशन किट्सच्या माध्यमातून पिंपरी - चिंचवड महापालिकेन केलेली ही मदत आपल्या जीवनात पुन्हा  जगण्याची नवी उमेद पैदा करणारी ठरेल. असा विश्वास राशन किट स्विकारताना अंधजन बांधवांनी व्यक्त केला. अंधाना मिळालेलं हे राशन पुढील तीन महिने त्यांची भूक भागवेल, मात्र त्यानंतरही कोरोनाची परिस्थिती कायम राहिली तर त्यांच्या पोटात भुकेची आग भडकणार नाही. याची काळजी घेणं प्रत्येक डोळस माणसाचं कर्तव्य आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com