राज्यमंत्री बच्चू कडूंनी केला प्लाझ्मा दान

राज्यमंत्री बच्चू कडूंनी केला प्लाझ्मा दान
bacchu kadu

अमरावती: राज्यमंत्री बच्चू कडू Bachchu Kadu यांनी आज अमरावतीच्या Amravati डॉ. पंजाबराव देशमुख Dr. Punjabrao Deshmukh स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, येथे कोरोना रुग्णांकरिता करीता प्लाझ्मा दान केला आहे. एकीकडे राज्यात कोरोना लसींचा तुटवडा असून दुसरीकडे रुग्णाच्या उपचारासाठी लागणारे रेमेडीसीवर इंजेक्शनसुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. Plasma donated by Bachchu Kadu

त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. अशावेळी रुग्णांना प्लाझ्मा थेरपी परिणामकारक ठरत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरात ज्या अँटीबॉडीज Antibodies तयार होतात त्या प्लाझ्माच्या स्वरूपात दुसऱ्या रुग्णांना दिल्या जातात, ज्यामुळे त्याची प्रकृती सुधारण्यात मदत होते.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना यापूर्वी कोरोनाची Corona बाधा झाली होती. त्यांनी आज कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करून कोरोना आजारातून बरे झालेल्या सर्वाना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले. तसेच १ मे पासुन १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र लस घेतल्यानंतर ६ महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लसीकरणाच्या अगोदर रक्तदान करावे असे आवाहनही बच्चू कडू यांनी यावेळी सर्व युवकांना केले.

Edited By- Digambar jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com