पंतप्रधान साधणार महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

पंतप्रधान साधणार महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
pm modi

चंद्रपूर - देशातील ज्या राज्यांमध्ये कोरोनाची Corona स्थिती गंभीर आहे अशा राज्यातील सुमारे 56 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi संवाद साधणार आहेत. यात  महाराष्ट्रातील Maharashtra 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. या संवादातून जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. pm will interact with district collectors

20 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून हा संवाद ऑनलाईन Online पद्धतीने होणार आहे. हा आढावा घेताना कोरोनाशिवाय आणखी काही विषय चर्चेला येणार काय, याची सध्यातरी जिल्हाधिकाऱ्यांना district collectors कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हे देखील पहा -

त्यामुळं यावर भाष्य करणं अवघड आहे, असं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले आहे. दरम्यान, पंतप्रधान कोणताही विषय पुढ्यात ठेऊ शकतात, हे गृहीत धरून प्रशासनानं कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस यासह इतर संबंधित विषयाचे अहवाल तयार करण्याची मोहीम गतिमान केली आहे.

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांशी साधणार संवादपंतप्रधान नरेंद्र मोदी   

1) अहमदनगर 
2) बुलढाणा 
3) चंद्रपूर 
4) सातारा 
5) नाशिक 
6) बीड 
7) पऱभणी 
8) सांगली 
9) अमरावती 
10) जालना 
11) वर्धा 
12) सोलापूर 
13) पालघऱ 
14) उस्मानाबाद 
15) लातूर 
16) कोल्हापूर 
17) नागपूर

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com