टोल नाक्यावर राडा करणाऱ्यांना पोलिसांच्या बेड्या

टोल नाक्यावर राडा करणाऱ्यांना पोलिसांच्या बेड्या
Mulund


मुलुंड : मुलुंड Mulund येथील आनंद नगर Anand Nagar टोल नाक्यावरील Toll Plaza व्यवस्थापकावर Manager हल्ला Attack करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटून पळून गेलेल्या तिघांना नवघर पोलिसांनी Police काही तासाच्या आत बेड्या Shackles ठोकल्या आहेत. हा हल्ला करणाऱ्यांपैकी दोन जण याच टोल नाक्याचे कर्मचारी आहेत.

राहुल पाथरे आणि सुनील धुरंधर अशी या कामगारांची नावे आहेत, त्यांनी ही लूट करण्या आधी दोन तीन दिवस कामावरून सुट्टी घेतली होती त्यांनी कैलास ठाकूर या अट्टल गुन्हेगाराच्या मदतीने ही लूट करण्याचा प्रयत्न केला होता. 

हे देखील पहा -

१२ तारखेला  रात्री १० वाजताच्या दरम्यान आनंद नगर  टोलनाक्यावरील व्यवस्थापक परेश सूर्यवंशी हे नेहमीप्रमाणे जमा झालेली टोलची रक्कम घेऊन जवळच असणाऱ्या त्यांच्या ऑफिसकडे पायी जात होते.

या वेळी अंधारात दबा धरून बसलेल्या या तीन आरोपींनी त्यांच्या डोक्यात लाकडी बांबू मारून त्यांना जखमी केले. त्यांच्याकडील साडे आठ हजार रुपयांची रोकड लुटून सोबत आणलेल्या दुचाकीवरून पळ काढला होता. 

या वेळी सूर्यवंशी यांनी आरडा ओरडा केल्याने टोल ऑफिस मधील कर्मचारी यांना राहुल पाथरेला पकडण्यात यश मिळाले व इतर दोघे रोख रक्कम घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले होते. ही घटना इथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती.

याबाबत सूर्यवंशी यांनी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नवघर पोलिसांनी भांडुप येथे लपून बसलेल्या इतर दोन्ही आरोपीना Accused बेड्या ठोकल्या आहेत Arrest. त्यांच्याकडून लुटण्यात आलेली रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com