पोलिसांचा हॉटेलवर छापा ; मद्यपान करणाऱ्या 41 जणांवर गुन्हा दाखल

 पोलिसांचा हॉटेलवर छापा ; मद्यपान करणाऱ्या 41 जणांवर गुन्हा दाखल
Police raid hotel; Charges filed against 41 people for drinking alcohol

कोरोनाच्या Corona  पार्श्वभूमीवर पुणे Pune City शहरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तरीसुद्धा सातारा Satara रस्त्यांवरील मांगडेवाडी Mangdewadi  परिसरातील साई गार्डन हॉटेलमध्ये  Sai Garden Hotel मद्यपान drinking सुरु होते. यावेळी भारती विद्यापीठ पोलिसांनी Bharti University Police कारवाई करत 41 जणांवर गुन्हा Crime दाखल केला आहे.( Police raid hotel ; Charges filed against 41 people for drinking alcohol )

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यांतील पोलिस अंमलदार विजय दुधाळ आणि शिंदे हे दोघे कात्रज परिसरात गस्ती करत होते. तेव्हा मांगडेवाडी परिसरातील साई गार्डन या हॉटेलसमोर दुचाकी लागलेल्या त्यांना दिसून आल्या होत्या.

हे देलहिल पहा - 

परंतु , हॉटेलचे शटर बंद होते. त्यामुळे आतमध्ये काहीतरी चालू असल्याचा त्यांचा संशय त्या पोलिसांमध्ये निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी शटर उघडून पहिले. तेव्हा आतमध्ये काही लोक मद्यपान करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिस स्टेशनला कळविली. 

यानंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक गंगाधर घावटे यांनी कर्मचाऱ्यांसह हॉटेलवर छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 25 दुचाकी, एक रिक्षा, एक चारचाकी, 07  लाख 05  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com