जतमध्ये अवैध विदेशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

जतमध्ये अवैध विदेशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
daru jat

सांगली : लॉकडाऊनमध्ये Lockdown मद्यविक्रीला बंदी घातलेली आहे. असे असताना देखील जत-बिळूर रस्त्यावर असलेल्या आशीर्वाद गार्डन हॉटेल येथे विदेशी मद्याची अवैध विक्री सुरु होती. Police Raid Illegal Foreign Liquor Sale in Sangli

या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळताच जत पोलिसांनी Police छापा टाकून सहा लाख त्रेसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल संबंधितांकडून जप्त केला. तर आशीर्वाद गार्डन हॉटेलचे मालक निलेश जाधव यांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे देखील पहा -

कोरोना Corona काळात मद्याची दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे चढ्या भावाने मद्य विक्री सुरू आहे. चढ्या भावाने मिळत असले तरी तळीराम मद्य खरेदी करतात. याचा फायदा उचलण्यासाठी काही जण अवैध पद्धतीने मद्य विक्री करीत आहेत. Police Raid Illegal Foreign Liquor Sale in Sangli

जत बिळूररोड येथील हॉटेल आशीर्वाद गार्डन येथे अवैध मद्यविक्री करणाऱ्या मालक निलेश जाधव यांना पोलिसांनी अटक  केली आहे. यामध्ये बेकायदा विदेशी मॅकडॉल कंपनीचे 180 मिलीचे 92 बॉक्स तसेच 750 मिलीचे 14 बॉक्स असा एकूण ७,६३,२०० रुपयांचा दारूचा साठा मिळून आला आहे.

Edited By : Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com