खेड पंचायत समिती कार्यालयाला पोलिसांचा विळखा
khed

खेड पंचायत समिती कार्यालयाला पोलिसांचा विळखा

पुणे - खेड Khed पंचायत समिती सभापती यांच्यावर अविश्वास ठरवा दाखल केल्यानंतर सभापती भगवान पोखरकर Bhagwan Pokharkar विरुद्ध शिवसेना Shivsena व राष्ट्रवादी काँग्रेस NCP सदस्य यांच्यात एका खाजगी रिसॉर्टवर तुंबळ हाणामारीचे नाट्य रंगल्यानंतर आज सकाळपासुनच खेड पंचायत समितीला पुणे Pune ग्रामीण पोलिसांच्या दंगल विरोधी पथकाच्या 12 जणांच्या तुकडीचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Police raid Khed Panchayat Samiti office

खेड पंचायत समितीच्या सभापती यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या यांच्या 11 जणांनी विश्वास ठराव दाखल केला आहे. 31 तारखेला प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या समोर विश्वास ठरावावर सुनावणी होणार आहे.

हे देखील पहा -

याआधीच पुण्यातील डोणजे येथील एका खाजगी रिसॉर्ट वर सहलीला गेलेल्या सदस्यांवर विद्यमान सभापती व एक सदस्य सहकारी यांनी जिवघेणा हल्ला केला हा सर्व हल्ल्याचा थरार रिसॉर्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानुसार हावेली पोलीस स्टेशन मध्ये प्रसाद काळे यांच्या फिर्यादीवरुन विद्यमान सभापती भगवान पोखरकर,केशव अरगडे,जालिंदर पोखरकर,यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Police raid Khed Panchayat Samiti office

खेड तालुक्यात कोरोना महामारीचे भिषण संकट असताना कोरोना काळातील मुख्य जबाबदारी पार पडणाऱ्या खेड पंचायत समितीतच राजकीय नाट्य सुरु झाले आहे. त्यामुळे खेड तालुक्यात या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात खेड पंचायत समितीला पुणे ग्रामीण पोलीसांच्या दंगल विरोधी पथकाचा बंदोबस्त सकाळापासुनच लागला आहे.

खेड पंचायत समिती सभापती पदावरुन सुरु झालेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वादाने आता तोंड बाहेर काढले असुन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळरावपाटील शिवसेनेची भुमिका मांडणार आहे त्यांच्या या भूमिकेकडे संपुर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com